Bengaluru Stampede
देश-विदेश
Bengaluru Stampede : बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांचं निलंबन
आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर बंगळुरूच्या संघाची विजयी मिरवणूक बुधवारी काढण्यात आली.
(Bengaluru Stampede ) आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर बंगळुरूच्या संघाची विजयी मिरवणूक बुधवारी काढण्यात आली. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघातील क्रिकेटपटूंचा सत्कार सोहळा चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार होता.
यासाठी स्टेडियमबाहेर लाखो चाहत्यांची गर्दी केली होती. मात्र मोठ्या प्रमाणात ही गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 11 जणांचा मृत्यू झाला, काहीजण जखमी झाले. या घटनेनंतर सगळीकडून यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. याच पार्श्वभूमीवर आता चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकारने आता मोठी कारवाई केली आहे.
बंगळुरु पोलीस आयुक्तांसह DCP, ACP, CPI यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्नाटकचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.