"राजीव गांधी दोन वेळा नापास असतानाही पंतप्रधान कसे झाले?', कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने उपस्थित केला प्रश्न

"राजीव गांधी दोन वेळा नापास असतानाही पंतप्रधान कसे झाले?', कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने उपस्थित केला प्रश्न

राजीव गांधीच्या शिक्षणावर पात्रतेवर प्रश्न उपस्थित
Published by :
Team Lokshahi
Published on

कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. अय्यर यांनी राजीव गांधी यांच्या शैक्षणिक योग्यतेवर टीका केली आहे. त्यामुळे आता एक वेगळाच विषय चर्चेत आला आहे.

दरम्यान मणिशंकर अय्यर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ते बोलत आहेत की, "राजीव गांधी प्रधानमंत्री झाले तेव्हा अनेक लोकांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते. ते एक वैमानिक होते. विद्यापीठामध्ये दोन वेळा नापास झाले होते. त्यांना कसं पंतप्रधान बनवलं? "

पुढे ते म्हणाले की, "जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान बनले तेव्हा सगळ्यांनाच आणि मलाही प्रश्न पडला की ते एक वैमानिक आहेत. ते दोन वेळा नापास झाले आहेत. मी त्यांच्याबरोबर केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेते आहे. जिथे सहज पास होता आलं असतं ते तिथे नापास झाले. केंब्रिज विद्यापीठात पास होणं हे नापास होण्यापेक्षा अधिक सोपं आहे. कारण विद्यापिठाची प्रतिमा चांगली राहण्यासाठी सर्व विद्यार्थी पास करावेत यासाठी विद्यापीठ प्रयत्न करते. नंतर त्यांनी इम्पिरियल कॉलेज लंडनमध्ये प्रवेश घेतला. पण तिथेही ते नापास झाले. अशी व्यक्ती पंतप्रधान कशी बनू शकते ? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला.

हा व्हिडीओ भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. कॉंग्रेसने मणिशंकर अय्यर यांच्या या सर्व टिप्पणी चुकीच्या असल्याचे नेत्यांनी म्हंटले आहे. अय्यर यांनी राजीव गांधी यांच्यावर 'द राजीव आय न्यू' हे पुस्तकही लिहिले आहे. अय्यर यांच्या या वक्तव्यावर कॉंग्रेस नेते हरिश रावत यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, "मी कोणत्याही हताश व्यक्तीवर टिप्पणी करणार नाही. मी राजीव गांधी यांना ओळखतो. त्यांनी नवीन भारत समोर आणला आहे".

तसेच यावर कॉंग्रेस नेते राशीद अल्वी म्हणाले की, "अमित मालविय यांना गोष्टी एडिट करण्याची सवय आहे. यामध्ये किती खरं आणि किती खोटं? हे मणिशंकर अय्यरच सांगू शकतील. राजीव गांधी पास झाले की नापास झाले? हा प्रश्न नाही. पण पंतप्रधान म्हणून राजीव गांधी कसे होते? तसेच पंतप्रधान झाल्यानंतर राजीव गांधी यांनी कशा प्रकारे काम केले? हे अधिक महत्त्वाचे आहे".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com