Switzerland Blast : स्वित्झर्लंड हादरलं! रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट, अनेकांचा मृत्यू
(Switzerland Blast) सरत्या वर्षाला निरोप देत संपूर्ण देश नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. राज्यात सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यातच स्वित्झर्लंड भीषण स्फोटाने हादरले आहे.
स्वित्झर्लंडमध्ये नववर्षाच्या स्वागतादरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. स्वित्झर्लंडमधील क्रांस मोंटाना या स्की रिसॉर्टमध्ये गुरुवारी पहाटे भीषण स्फोट झाला. या स्फोटात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून भीषण स्फोट झाल्याने प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
Summary
नववर्षाच्या स्वागतादरम्यान स्वित्झर्लड स्फोटानं हादरलं
स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती
स्वित्झर्लडच्या बारमध्ये नववर्षाच्या स्वगतावेळी स्फोट
