Iraq Mall Fire
देश-विदेश
Iraq Mall Fire : इराकमधील मॉलमध्ये भीषण आग; 50 जणांचा मृत्यू
इराकच्या अल-कूत शहरात एका मॉलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
(Iraq Mall Fire) इराकच्या अल-कूत शहरात एका मॉलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 50 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही दुर्घटना गुरुवारी घडली असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाच मजली इमारत आगीच्या भक्षस्थानी पडलेली दिसत आहे.
या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्रशासनाने प्राथमिक तपास सुरु केला असून पुढील दोन दिवसांत त्याचा अहवाल जाहीर केला जाईल. अशी माहिती मिळत आहे. अनेक नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले असले तरी काही जण आत अडकून पडले आहेत.
अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या आगीच्या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.