Whatsapp Down : UPI पाठोपाठ Whatsapp देखील डाऊन, युजर्स गोंधळले

Whatsapp Down : UPI पाठोपाठ Whatsapp देखील डाऊन, युजर्स गोंधळले

सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास व्हॉट्सअॅपमध्ये अडचण आल्याने नेटीझन्स युजर्सं काही काळ गोंधळल्याचं दिसून आलं.
Published by :
Shamal Sawant
Published on

UPI पाठोपाठ आज मेसेजिंग अप व्हॉट्सअपदेखील डाऊन झाल्याचे बघायला मिळाले. जगभरातील अनेक युजर्सना मेसेज पाठवण्यासाठी, स्टेट्स ठेवण्यासाठी आणि मेसेज अप उघडण्यासाठी अडचणी आल्याचे बघायला मिळाले. सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास व्हॉट्सअॅपमध्ये अडचण आल्याने नेटीझन्स युजर्सं काही काळ गोंधळल्याचं दिसून आलं. त्यामुळे नेटीझन्सने ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देत आहेत.

आज सायंकाळी काही युजर्संना मेसेज पाठविण्यासाठी, स्टेटस ठेवण्यासाठी अडचण येत होती. त्यामुळे, डाऊन डिटेक्टरवरही अनेक व्हॉट्सअप युजर्संने व्हॉट्सअप डाऊन झाल्यासंदर्भात तक्रार केल्या आहेत. त्याचप्रमाणे व्हॉट्सअप डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा मिम्स आणि मजेशीर विनोद शेअर होताना दिसून येत आहेत. तसेच व्हॉट्सअप डाऊन झाल्याची माहिती देखील अनेकांनी ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com