Divya Deshmukh
Divya Deshmukh

Divya Deshmukh : महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुखची लंडनमध्ये अभिमानास्पद कामगिरी; बुद्धिबळ स्पर्धेत जगातील नंबर 1 च्या खेळाडूला हरवलं

18 वर्षीय दिव्या देशमुखने लंडनमध्ये झालेल्या वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये जागतिक क्रमांक एक वर असलेल्या हो यिफनचा पराभव करून सर्वांचे लक्ष वेधले.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Divya Deshmukh ) 18 वर्षीय दिव्या देशमुखने लंडनमध्ये झालेल्या वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये जागतिक क्रमांक एक वर असलेल्या हो यिफनचा पराभव करून सर्वांचे लक्ष वेधले. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर दिव्याने दुसऱ्या फेरीत शानदार पुनरागमन करत पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना यिफानला नमवले. वेळेचे व्यवस्थापन आणि अचूक डावपेच यांच्या जोरावर तिने हा विजय मिळवला. तिच्या या यशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X वरून अभिनंदन करत म्हटले की, तिचा विजय नवोदितांना प्रेरणा देणारा आहे.

दिव्याचा जन्म 9 डिसेंबर 2005 रोजी नागपूर येथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षी तिला बुद्धिबळाची गोडी लागली. केवळ सातव्या वर्षी तिने राष्ट्रीय अंडर-7 स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिने डर्बन (2014) येथे अंडर-10 आणि ब्राझील (2017) येथे अंडर-12 वर्ल्ड युथ स्पर्धा जिंकल्या.

ती 2021 मध्ये वूमन ग्रँडमास्टर (WGM) बनली आणि 2023 मध्ये इंटरनॅशनल मास्टर (IM) पदवी मिळवली. 2024 मध्ये तिने वर्ल्ड ज्युनिअर गर्ल्स U-20 चॅम्पियनशिपमध्ये 10/11 गुण मिळवत विजेतेपद मिळवले. त्या वर्षीच तिने बुडापेस्टमधील बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. दिव्या सध्या चेन्नई येथील Chess Gurukul मध्ये GM आर. बी. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com