Nepal Airplane Fire | विमानाला अचानक आग, नेपाळमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

नेपाळमध्ये बुद्ध एअरच्या विमानाला आग लागल्याने काठमांडू विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग, सर्व ७६ प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप.
Published by :
shweta walge

नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमानाचे लँडिंग झाल्याचे विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. हे बुद्ध एअरचे फ्लाइट आहे, यामध्ये क्रू मेंबर्ससह ७६ प्रवासी होते.

विमानाच्या डाव्या इंजिनला आग लागल्याने लँडिंग करण्यात आले. या अपघातात कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. विमानाचे सुखरूप लॅडिंग झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com