पहिला मुली कपडे... ; हे काय म्हणाले बिहारचे CM नीतीश कुमार?
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टिका होत आहे. आपल्या राज्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी ते बेगूसराय येथे दौऱ्यावर असताना त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद उफाळला आहे.
शनिवारी ते बेगूसराय बिहारमधील जीविका दिदी यांच्यासोबत चर्चा करत होते. यावेळी त्यांनी महिलांच्या कपडे घालण्यावरून आणि अभिव्यक्तिमध्ये आलेल्या सकारात्मक बदलाविषयी प्रशंसा केली. मात्र, त्यांचं हे वक्तव्य काही लोकांना अनुचित वाटलं. याआधीही नीतीश कुमार यांच्या वक्तव्यावरून वाद झाला होता. विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाकडून नीतीश कुमार यांच्यावर टिका करण्यात आली.
पहिला कोणी मुली कपडे घालत होत्या - नीतीश कुमार
बिहारच्या बेगूसराय येथे जीविका दिदी चर्चा करताना नीतीश कुमार म्हणाले की, पहिला कोणी मुली कपडे घालत होत्या असं प्रश्नार्थक वक्तव्य करत पुढे म्हणाले आता किती चांगलं झालंय. सगळ्या मुली किती चांगले कपडे घालत आहेत आणि किती चांगलं संभाषण करतात. पहिले इतकं चांगलं त्यांना बोलता यायचं नाही. आता सगळं ठीक आहे. असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेले मंत्री विजय कुमार चौधरी आणि सम्राट चौधरी नीतीश कुमार यांनी केलेल्या वक्तव्यावर थोडे संकोचित झाल्याचं पाहायला मिळालं.