Indian Railway: आता स्लीपर कोचमध्ये मिळणार AC कोच सारख्या सुविधा; रेल्वेचा मोठा निर्णय
(Indian Railway) भारतीय रेल्वेतून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. गेल्या काही वर्षांत रेल्वेच्या सेवेत खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. आता एसीसारख्या सुविधा स्लीपर कोचमध्ये मिळणार आहे. आता लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या स्लीपर कोचमध्ये चांगल्या सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्लीपर क्लासच्या प्रवाशांनाही एसी कोचसारखे फायदे मिळतील. तसेच एसी आरक्षित कोचप्रमाणेच हात धुण्यासाठी लिक्विड सोप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय रेल्वेने OBHS सेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या स्लीपर कोचमध्ये लिक्विड हँडवॉश डिस्पेंसर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये आता लिक्विड हँड वॉश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनवर आता अनेक नवीन सुविधा वाढल्या आहेत. आता रेल्वेच्या स्लीपर कोच आणि जनरल कोचमध्ये सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे.
रेल्वेत एसी कोचमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा नॉन एसी कोचमध्येही दिल्या जाणार आहेत. रेल्वेने लांब पल्ल्याच्या स्लीपर कोच डब्यांमध्ये लिक्विड हँडवॉश लावण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ही सुविधा फक्त एसी डब्यांमध्ये दिली जात होती. आता नॉन एसी आरक्षित कोचमध्ये ऑनबोर्ड हाउसकिपिंग सेवेसोबत लिक्विड सोप देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर ऑन-बोर्ड हाऊसकीपिंग सेवा असलेल्या सर्व नॉन-एसी स्लीपर आरक्षित कोचमध्ये सुविधा दिली जाणार आहे.