दिलासा ! LPG सिलेंडरच्या किंमतींमध्ये घट, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत
ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी मंगळवारी कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपातीची घोषणा करण्यात आली आहे. 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतींध्ये 41 रुपयांची कपात झाली आहे. या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये आता व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1762 रुपये असणार आहे. कपातीनंतर मुंबईमध्ये 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1,714.50 रुपये, कोलकाता येथे 1,872 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,924.50 रुपये झाली आहे.
गेल्या महिन्यातच 1 मार्च 2025 रोजी तेल कंपन्यांनी प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 6 रुपयांनी वाढ केली होती. कच्च्या तेलाच्या जागतिक किंमती आणि इतर बाजारातील इतर घटकांवर आधारित, भारतातील तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल आणि वायूच्या किमती सुधारतात.
गेल्या काही वर्षांत, अन्न आणि स्वयंपाकाशी संबंधित व्यवसायांना खर्चात अनपेक्षित वाढ झाली आहे. मार्च 2023 मध्ये, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये 352 रुपयांची मोठी वाढ झाली, ज्यामुळे रेस्टॉरंट्स आणि इतर आस्थापनांच्या परिचालन खर्चावर परिणाम झाला.या चढउतारानंतरही, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती अनेक महिन्यांपासून कायम आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.