Operation Mahadev : पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याने केला खात्मा

Operation Mahadev : पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याने केला खात्मा

ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याने घेतला बदला
Published by :
Shamal Sawant
Published on

काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी धर्म विचारून 26 नागरिकांची गोळ्या घालून हत्या केली. या भ्याड हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवले.मात्र या हल्ल्यातील हल्लेखोर मात्र निसटले. दरम्यान, आता याच हल्ल्यामध्ये सहभाग असलेल्या दहशतवाद्यांसदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

एप्रिल महिन्यापासून भारतीय सैन्य जम्मू काश्मीरमध्ये या दहशतवाद्यांचा शोध घेत होते.मुसा सुलेमानी हा दहशतवादी पहलगामच्या हल्ल्यात सहभागी होता त्यालाही ठार करण्यात आले आहे. शेवटी आता भारताच्या शूर सैनिकांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असल्याची माहिती समोर आली आहे.

संसदेत आज ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा सुरु आहे. ऑपरेशन सिंदूर कसे राबवण्यात आले? यात भारताचे किती नुकसान झाले? तसेच पाकिस्तानने केलेले हल्ले कसे परतवून लावण्यात आले? याबाबतची सर्व माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. यावेळी बोलताना भारतीय हवाई दलाच्या वेगवेगळ्या तळांना पाकिस्तानने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक उपकरणं यांच्या मदतीने हे सर्व हल्ले परतवून लावण्यात आले. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचे कोणतेही नुकसान झालेले नाही, असे राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com