Operation Sindoor : India Pakistan War: ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकिस्तानवर मोठी कारवाई, टॉप 5 दहशतवादी ठार

Operation Sindoor : India Pakistan War: ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकिस्तानवर मोठी कारवाई, टॉप 5 दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Pahalgam Attack) जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेले ऑपरेशन सिंदूर ( Operation Sindoor ) सुरु करण्यात आले आहे. पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करून भ्याड हल्ले केले आहेत. जो सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताच्या 7 मे रोजी करण्यात आलेल्या कारवाईत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे हवाई अड्डे उद्ध्वस्त केले होते. यामध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांशी संबंधित पाच मोठ्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

यामध्ये मुदस्सर खडीयन खास ऊर्फ अबू जुनदल (लष्कर-ए-तैयबा), मोहम्मद युसूफ अझहर ऊर्फ उस्ताद जी (जैश-ए-मोहम्मद), हाफिज मोहम्मद जमिल (जैश-ए-मोहम्मद), मोहम्मद हसन खान (जैश-ए-मोहम्मद), खालिद ऊर्फ अबू अकाशा (लष्कर-ए-तैयबा) यांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com