देश-विदेश
Prakash Ambedkar on Donald Trump : "शस्त्रसंधीची माहिती अमेरिकेकडून का? " प्रकाश आंबेडकर यांचा मोदी सरकारला सवाल
याबद्दलची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडून का नाही ऐकायला मिळाली? असंदेखील म्हणाले आहेत.
शस्त्रसंधीची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी का केली? यावर चर्चा सुरु असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रश्न उभे केले आहेत. शस्त्रसंधीची माहिती आपल्याला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली? असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे. याबद्दलची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडून का नाही ऐकायला मिळाली? असंदेखील म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान आपल्या राष्ट्र आणि परराष्ट्र धोरणाबद्दल उपकार केल्यासारखे आणि मोठेपणा मिरवण्यासारखे होते. कारण, परराष्ट्र मंत्रालयाच्या मीडिया ब्रीफिंगवरून हे स्पष्ट झाले की या निर्णायत आपल्याच देशाचा पुढाकार होता", असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.