Pahalgam Terrorist Attack : देश शोकात, पाकिस्तानी दूतावासात केक पार्टी: अजित डोवाल यांनी शेअर केला व्हिडीओ
देशात घडलेल्या दहशतवादी घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 28 निष्पाप जीवांचा बळी घेतला गेला. गोळ्या झाडताना त्यांनी पर्यटक हिंदू असल्याचे विचारले. संपूर्ण देशभरात या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता दिल्लीमधील पाकिस्तान दुतावासात असलेला एक कर्मचारी केक घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शेअर केला आहे.
अजित डोवाल यांनी व्हिडीओ शेअर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दरम्यान केक घेऊन जाताना माध्यमांनी केक घेऊन जाणाऱ्या व्यक्तीस प्रश्न विचारले. 'हा केक कशासाठी?', 'काय साजरे करण्यासाठी केक घेऊन जात आहात?', मात्र या सगळ्या प्रश्नांना कोणतेही उत्तर न देता तो निघून गेला.
अजित डोवाल यांनी ट्वीट करत लिहिले की, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोक व्यक्त करत आहे. पण इथे दिल्लीच्या पाकिस्तान दूतावासात मध्ये केक मागवला जात आहे. किती निर्लज्ज लोक आहेत हे". हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
पाकिस्तानी दूतावासाची सुरक्षा कमी केली :
भारत-पाकिस्तान संबंधांचा परिणाम दिसू लागला आहे. दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे. सध्या पाकिस्तानी दूतावासाबाहेर शांतता आहे. सुरक्षा कर्मचारी दिसत नाहीत.