Pahalgam Attack: माझ्या नवऱ्याला वाचवा ! मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर
जम्मू काश्मीर येथील पहलगाममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बैसरन व्हॅलीमध्ये एका खुल्या मैदानात पर्यटकांकर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दरम्यान यावेळचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये जीवित महिलेने धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, महिला स्थानिक दुकानदाराची मदत घेत आहे. यामध्ये हल्ल्याचा उल्लेख करणाऱ्या एका महिलेने म्हटले आहे की, एका पुरूषाने येऊन तिच्यावर गोळीबार केला. ती बाई म्हणत आहे की, आपण भेळपुरी खात होतो. तिथे दहशतवादी आला आणि हिंदू आहे का विचारले. नाही म्हंटल्यानंतर त्याने गोळी मारली. काही अंतरावर उभी असलेली एक महिला तिच्या पतीला वाचवण्यासाठी विनवणी करत आहे.
व्हिडिओमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दोन लोक जमिनीवर पडलेले दिसत आहेत. तर त्याच व्हिडिओमध्ये काही अंतरावर खुर्चीवर बसलेला एक व्यक्ती बेशुद्ध पडला आहे. दुकानदार त्याला पाणी पिण्याची विनंती करत होता. पहलगाम हल्ल्यानंतरच्या या व्हिडिओमध्ये पर्यटकांचा हा गट कुठे थांबला होता हे उघड झाले आहे.
दरम्यान या दहशदवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध नोंदवला आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, "जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे".
नंतर त्यांनी लिहिले की, "या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्याय मिळवून दिला जाईल. त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल".