Pakistan Bomb Blast : पाकिस्तान हादरला, मोठा बॉम्बस्फोट, 7 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Pakistan Bomb Blast : पाकिस्तान हादरला, मोठा बॉम्बस्फोट, 7 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पहलगाममध्ये हल्ल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पहलगाममध्ये हल्ल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

पाकिस्तानाच्या दक्षिण वजीरिस्तान जिल्ह्यातील मुख्य शहर असलेल्या वाना येथे बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हा स्फोट मोठा असून यात मोठ्या प्रमाणावर लोक जखमी होऊन मालमत्तांचे नुकसानही झाल्याची माहिती मिळत आहे. हा हल्ला नेमका कुणी केला? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या हल्ल्याची जबाबदारी सध्या कोणत्याही संघटनेकडून घेण्यात आलेली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com