पाकिस्तानने चीनकडे मागितली भीक, 10 अब्ज डॉलर्सची केली मागणी

पाकिस्तानने चीनकडे मागितली भीक, 10 अब्ज डॉलर्सची केली मागणी

पाकिस्तानने चीनकडे कर्ज मागीतल्याचे समोर आले आहे.
Published by :
Shamal Sawant
Published on

काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना परतण्यास सांगितले आहे. मात्र पाकस्तान आता एका वेगळ्याच आर्थिक विवंचनेत अडकला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने चीनकडे कर्ज मागीतल्याचे समोर आले आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब म्हणाले की, पाकिस्तानने चीनला त्यांची विद्यमान स्वॅप लाइन 10 अब्ज युआन म्हणजे 1.4 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे.

स्वाईप लाइन म्हणजे काय ?

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या बैठकीदरम्यान रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे अर्थमंत्री औरंगजेब म्हणाले की, "पाकिस्तानकडे आधीच 30 अब्ज युआनची स्वॅप लाइन आहे". वेगवेगळ्या देशांच्या मध्यवर्ती बँकांमध्ये चलनांची देवाणघेवाण करण्यासाठी केलेल्या कराराला स्वॅप लाइन म्हणतात. पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी चीनसोबतच्या या कराराची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

2024 मध्ये केली होती विनंती :

यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये, पाकिस्तानने चीनकडे 10 अब्ज युआन (1.4 अब्ज डॉलर्स) अतिरिक्त कर्जाची विनंती केली होती. रोख रकमेची कमतरता असलेल्या या देशाने आधीच विद्यमान 30 अब्ज युआन (4.3 अब्ज डॉलर्स) चा चीनी व्यापार सुविधेचा वापर केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com