पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'वंतारा वाइल्डलाईफ'चे उद्घाटन, प्राण्यांबरोबरचे सुंदर फोटो समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'वंतारा वाइल्डलाईफ'चे उद्घाटन, प्राण्यांबरोबरचे सुंदर फोटो समोर

पंतप्रधानांनी वनतारा येथील वन्यजीव रुग्णालयाला भेट दिली.
Published by :
Team Lokshahi
Published on

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. याआधी त्यांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगालादेखील भेट दिली आणि आशीर्वाद घेतले. दरम्यान त्यांनी जागतिक वन्यप्राणी दिनानिमित्त गीर अभयरण्यात व्याघ्र आणि सिंह प्रकल्पाला भेट दिली. त्याचप्रमाणे त्यांनी जामनगर येथील मुकेश अंबानी यांच्या वंतारालादेखील भेट दिली.

गुजरातमधील वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र असलेल्या वंतारा वाईल्डलाईफचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. वनतारामध्ये सध्या दोन हजाराहून अधिक प्रजाती आणि दीड लाखांहून अधिक संकटात सापडलेल्या आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांची काळजी घेतली जाते.

पंतप्रधानांनी वंतारा येथील वन्यजीव रुग्णालयाला भेट दिली. यात प्राण्यांसाठी एमआरआय, सीटी स्कॅन, आयसीयू आणि इतर सुविधा आहेत. त्यात वन्यजीव भूल, हृदयरोग, नेफ्रोलॉजी, एंडोस्कोपी, दंतचिकित्सा, अंतर्गत औषध यासह अनेक विभाग आहेत.

इतर ठिकाणांहून सुटका करण्यात आलेल्या प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासाप्रमाणे असलेल्या ठिकाणी ठेवले जाते. वनतारामधील काही प्रमुख संवर्धन उपक्रमांबद्दल सांगताना, त्यात एशियाटिक सिंह, एक शिंगी गेंडा इत्यादींचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com