Operation Sindoor : भारत Nuclear Blackmail सहन करणार नाही, नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानच्या पोकळ धमक्या सहन केल्या जाणार नाहीत असे ते म्हणाले.
Published by :
Shamal Sawant

भारत आणि पाकिस्तान ययांच्यामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर' राबवले. यामध्ये भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करत ते उद्ध्वस्त केले. त्यानंतर मात्र पाकिस्तानने हल्ला केला. पाकिस्तानने केलेला प्रत्येक हल्ला भारताने परतवून लावला. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या पोकळ धमक्या सहन केल्या जाणार नाहीत असे ते म्हणाले.

मोदी म्हणाले की, पाकिस्तान काय भूमिका घेतो ते येत्या काळात दिसेल. तिन्ही भारतीय सैन्य आणि बीएसएफ सतर्क आहेत. सर्जिकल आणि एअर स्ट्राइकनंतर, ऑपरेशन हे दहशतवादाविरुद्ध भारताचे धोरण आहे. जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल. आम्ही आमच्या स्वतःच्या अटींवर प्रतिसाद देऊ. दहशतवादाची मुळे जिथे जिथे उफाळून येतील तिथे आम्ही कारवाई करू. भारत कोणताही न्यूक्लियर ब्लॅकमेल सहन करणार नाही. भारत अचूकता आणि निर्णायकतेने प्रहार करेल. आपण दहशतवादाला आश्रय देणारे सरकार आणि दहशतवादाचे सूत्रधार वेगळे पाहणार नाही. तसेच पाकिस्तानशी जर चर्चा करायची झाली तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवाद यावरच होईल. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com