PM Modi on Operation Sindoor : "त्यांनी आमच्या बहिणीचं कुंकू पुसलं...", पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या भावना
जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर' राबवले. यामध्ये भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करत ते उद्ध्वस्त केले. त्यानंतर मात्र पाकिस्तानने हल्ला केला. पाकिस्तानने केलेला प्रत्येक हल्ला भारताने परतवून लावला. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या आहेत.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे सुट्टीचा आनंद घेणाऱ्या 26 हिंदू पर्यटकांना दहाशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. यावेळी फक्त पुरुषांनाच मारले आणि महिलांना सोडून दिले. आपल्या देशाच्या बहीणींचं कुंकू पुसल्याची भावना ही प्रत्येकाच्या मनात होती. याच घटनेचा बदला भारतीय सैन्याने घेतला असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. देशाला संबोधत असताना मोदी म्हणाले की, "दहशतवाद्यांनी आमच्या बहीणींचं कुंकू पुसलं त्याचाच बदला घेतला" असं मोदी यांनी स्पष्ट केले आहे.