प्रयागराजमध्ये महापूर ! वाहनांच्या रस्त्यावर लांबच्या लांब रांगा,प्रशासनाकडून हालचाली सुरु

प्रयागराजमध्ये महापूर ! वाहनांच्या रस्त्यावर लांबच्या लांब रांगा,प्रशासनाकडून हालचाली सुरु

कटणी-प्रयागराज दरम्यान 300 किलोमीटर वाहनांची रांग
Published by :
Team Lokshahi
Published on

सध्या प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु आहे. या कुंभमेळ्यासाठी जगभरातून अनेक भाविक भेट देत आहेत. मात्र आता या कुंभ मेळ्यासंदर्भातील एक माहिती समोर येत आहे. माघी पोर्णिमेनिमित्त स्नान करता यावे यासाठी भाविक महाकुंभ मेळ्यामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक राज्यांतून लोक येत असल्याने आता ट्रॅफिक जॅमची समस्या उद्भवली आहे. कटणी ते प्रयागराज दरम्यान सुमारे 300 किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

जॅम झालेल्या ट्रॅफिकमुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे. नॅशनल हायवेवर पोलिस जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. तसेच धनगवा येथे वाहने थांबवली जात आहेत. कटणी-प्रयागराज या दरम्याने जे लोक ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत त्यांची स्थानिक लोक मदत करत आहेत. काही ठिकाणी पाणी पुरवले जात आहे तर काही ठिकाणी खिचडीचेही वितरण केले जात आहे. शेकडो किलोमीटर अडकलेल्या या ट्रॅफिकमध्ये महिला, वृद्ध व तरुण असे सगळेच अडकले आहेत. यामध्ये अनेक चारचाकी वाहने असून शेकडो यात्री बसेसदेखील आहेत.

144 वर्षांनंतर महाकुंभ मेळा आला आहे. त्यामुळे ही संधी परत मिळणार नाही म्हणून अनेक भाविकांनी जाण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आता शेकडो किलोमीटरच्या रांगांमध्ये भाविक अडकले आहेत. मात्र कितीही अडचणी आल्या तरीही कुंभमेळ्यामध्ये सहभाग घेणार अशी सगळ्याच भाविकांची भावना आहे. दरम्यान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी भाविकांना आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव काय म्हणाले?

सर्व भाविकांना विनंती आहे की प्रवासादरम्यान काळजी घ्या. तसेच प्रशासनालादेखील सहकार्य करा. तसेच या क्षेत्राअंतर्गत सर्व प्रतिनिधीना सहकार्य करा.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com