अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी मोजावा लागणार बक्कळ पैसा, ट्रम्प सरकारची नवी योजना
सध्या अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आहे. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा भारतालादेखील फटका बसला आहे. अमेरिकेमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांना अमेरिकेने पुन्हा भारतात पाठवले. मात्र आता ट्रम्प सरकारने नवीन योजना आणली आहे. जगातील कोणत्याही नागरिकाला अमेरिकेचे नागरिकत्व घ्यायचे असेल तर त्याला पैसे मोजावे लागणार आहेत.
नवीन नियमानुसार, काही प्रक्रियांचे पालन केल्यानंतर आणि पैसे भरल्यानंतर अमेरिकन नागरिकत्व मिळू शकते. यासाठी तुमहला 5 मिलियन डॉलर्स म्हणजे 43 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे अमेरिकन नागरिकत्व हवे असल्यास मोठ्या प्रमाणात पैसा मोजावा लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत 5 दशलक्ष डॉलर्सचे गोल्ड कार्ड लॉन्च केले आहे. याला अमेरिकन ग्रीन कार्डही म्हणतात. यामध्ये अधिक सुविधाही उपलब्ध होणार आहेत. पण नवीन सुरु झालेला हा नागरिकत्व कार्यक्रम सिटीझन बाय इन्व्हेस्टमेंट अंतर्गत असेल. जे जगातील अनेक देशांमध्ये आहे.
'या' देशांमध्येही पैसे देऊन मिळते नागरिकत्व
UAE मध्ये, तुम्हाला 1.36 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 11.5 कोटी रुपये देऊन गोल्डन व्हिसा मिळतो. तसेच तुम्ही चार लाख डॉलर्स म्हणजेच 3.3 कोटी रुपयांची रिअल इस्टेट गुंतवणूक करून तुर्कस्तानमध्ये नागरिकत्व मिळवू शकता. मॉरिशसमध्ये 5 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 4.1 कोटी रुपयांची गुंतवणूक करून नागरिकत्व मिळू शकते. याशिवाय 5 लाख युरो म्हणजेच 4.5 कोटीमध्ये भारतीयांना स्पेनचे नागरिकत्व मिळवू शकता. जगात इतर अनेक देश आहेत जिथे तुम्ही अशा प्रकारे नागरिकत्व घेऊ शकता.