China Nuclear : चीनमध्ये अण्वस्त्रांची झपाट्याने वाढ ; चीन 2035 पर्यंत सुमारे 1,500 अण्वस्त्रे जमा करण्याची शक्यता
चीनची अण्वस्त्रांची संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे. जगात इतकी अण्वस्रं तयार करण्यात आली आहेत की त्यामुळे आपल्या पृथ्वीचा विध्वंस होऊ शकतो. आता चीनने अण्वस्र निर्मितीचा वेग प्रचंड वाढविल्याचा अहवाल अमेरिकेने सादर केला आहे. चीनच्या नव्या धोरणानुसार 2023 पासून दरवर्षी चीन हा देश आपल्या अण्वस्त्रांच्या संख्येमध्ये दरवर्षी 100 नव्या अण्वस्त्राने वाढ करत आहे. त्यामुळे आता रशिया आणि अमेरिकेसह भारतात ही चिंतेचे वातावरण आहे. आता इतर देशांच्या मानाने चीनच्या अण्वस्त्रांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार हे निश्चित चित्र आहे.
SIPRI ने अंदाज व्यक्त केला आहे की, चीन देखील आता आपली अण्वस्त्रे लॉन्च स्थितीमध्ये ठेवणार आहे एस आय पी आर आयच्या अंदाजानुसार, 2035 पर्यंत चीनची अन वस्त्रांची संख्या पंधराशे पर्यंत पोहोचली तरीसुद्धा रशिया आणि अमेरिकेच्या मानाने ती खूपच कमी असणार आहे कारण अमेरिका आणि रशियाकडे सध्या 4000 ते 6000 अण्वस्त्रे आहेत मात्र यामुळे त्या तिघांमध्ये स्पर्धा वाढणार हे निश्चित आहे.
इस्रायलने अधिकृतपणे आपले अण्वस्त्र धोरण जर व्यवस्थित ठेवले तर पुढच्या येत्या काही वर्षांमध्ये अणवस्त्राच्या बाबतीमध्ये चीनचा क्रमांक नक्कीच पुढे वाढणार आहे. 2024 मध्ये भारताने सुद्धा आपले अन्न वस्त्रांमध्ये साठवणूक वाढवली असून त्यांचे धोरण पूर्णत्वास गेलं तर एका क्षेपणास्त्रातून अनेक वार हेड सोडण्याचे क्षमता भारत मिळवू शकणार आहे. पाकिस्तान मध्ये ही अण्वस्त्र वाढीबाबत पुढाकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे.
SIPRI नुसार 2023 पासून, चीनने दरवर्षी सुमारे 100 नवीन वॉरहेड्स जोडले आहेत, ज्यामुळे त्याची अण्वस्त्र क्षमता वाढली आहे. या वाढत्या क्षमतेमुळे, चीन इतर देशांसाठी एक मोठे आव्हान बनला आहे. पेंटागॉनच्या अहवालानुसार, चीन 2035 पर्यंत सुमारे 1,500 अण्वस्त्रे जमा करण्याची शक्यता आहे. चीन आपल्या अण्वस्त्र ताकदीचा वापर करून इतर देशांना हरवण्याचा प्रयत्न करणार आहे. जगामध्ये पुन्हा एकदा अण्वस्त्रे जमवण्याची स्पर्धा लागली असून याचा परिणाम म्हणजे आपले मानवी आयुष्य हे सर्वाधिक धोक्याच्या टप्प्यावर आहे हे नक्की
SIPRI च्या अंदाजानुसार, जगभरात अंदाजे 12,512 अणुबॉम्ब आहेत. केवळ दोन वर्षांत चीनने अण्वस्त्रांचा साठा दुप्पट केला. ज्यामुळे आता अमेरिकेसारख्या देशाची सुद्धा चिंता वाढली आहे. या वाढत्या अण्वस्त्रांच्या संख्येमुळे भारताला ही सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.