पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या कालखंडातील विविध योजनांचा आणि कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ही 11 वर्षे म्हणजे ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ यांची अमलात आणलेली संकल्प सिद्धी आहे. आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत हा प्रवास अत्यंत गतिशील, निर्णयक्षम आणि भ्रष्टाचारविरोधी कार्यसंस्कृतीने घडलेला आहे.
महाराष्ट्रात पावणेदोन लाख कोटींचे रेल्वे प्रकल्प सुरू आहेत. यूपीए सरकारने जेवढे पैसे दहा वर्षात दिले नाहीत तेवढे मोदी सरकारने एका वर्षात मंजूर केले. 6 लाख कोटींच्या अवस्थापना प्रकल्पांची कामे महाराष्ट्रात सुरू आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एका वर्षात 30 लाख घरे वितरित झाली आहेत. ज्यांना घरी मिळाली नाहीत असे आमचे सर्वेक्षण करून त्यांनाही घरी वाटण्याचे मोदी सरकारचे आदेश आहेत. 81 कोटींना मोफत अन्नधान्य वाटप केले आहे, 15 कोटींना नळजल प्रकल्प पूर्ण केले आहेत.12 कोटी घरांमध्ये शौचालये निर्माण केली आहेत. 10 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मुद्रा योजनेतून कर्ज दिले आहे. स्टँड अप इंडिया अंतर्गत अनुसूचित जाती-जमातींना 14700 कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे 55 कोटी जनधन खाती उघडली गेली आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा योजना – 51 कोटी लाभार्थ्यांना फायदा झालेला आहे. जीवन ज्योती – 23 कोटी लाभार्थ्यांना फायदा झाला आहे. आयुष्मान भारत अंतर्गत 77 कोटी आरोग्य खाती उघडण्यात आली आहेत. थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 43 लाख कोटी रक्कम खात्यात जमा झाली आहे.
कृषी बजेट 27000 कोटी वरून 1.37 लाख कोटी केले आहे. पीएम किसान अंतर्गत 11 कोटी शेतकऱ्यांना 3.7 लाख कोटी निधी वाटप केले आहे. सिंचन प्रकल्पासाठी 93000 कोटी मंजूर केले आहेत (महाराष्ट्राला 25000 कोटी). प्रधानमंत्री फसल विमा – 1.75 लाख कोटी निधी पुरवला आहे. तांदळाच्या किमतीत 1345 वरून 2303 प्रति क्विंटल वाढ केली आहे , गव्हाच्या किमतीत 1350 वरून 2125 रुपये एवढी वाढ आहे. दूध उत्पादन 14 कोटी टन वरून 23 कोटी टन एवढी झालेली आहे. मधाच्या निर्यातीत तिप्पट वाढ आहे , मत्स्य उत्पादनात 184 लाख टन वाढ झालेली आहे. इथेनॉल उत्पादन 38 कोटी लिटर वरून 440 कोटी लिटर झाले आहे, यामुळे 1 लाख कोटींचं परकीय चलन वाचलं आहे. मेगा फूड पार्क 3 वरून 54 संख्या झाली आहे. सौर पंप १ लाख वरून 10 लाख संख्या झाली आहे (त्यातील 5 लाख महाराष्ट्रात आहेत). सहकार क्षेत्राला 95000 कोटींची मदत केली आहे.
नारीशक्ती वंदन अधिनियमांतर्गत लोकसभा व विधानसभा 33% महिलांसाठी आरक्षित केले आहे. संरक्षण दलांत महिलांना कायमस्वरूपी कमिशन आयोग स्थापना केली आहे. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांचा सहभाग असणार आहे , एनडीएमध्ये प्रवेश दिला आहे , नियंत्रण रेषेवर महिलांची तैनाती केली आहे. भारताचा लिंग गुणोत्तर 1000:1020 झाले आहे. मातृ वंदना योजनेचा लाभ 3.98 कोटी महिलांना झाला आहे. उज्वला योजनेत 10.33 कोटी कनेक्शन दिले गेले आहेत. पीएम आवास योजनेतील 73% घरे महिलांच्या नावावर केले आहेत. सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत 4.2 कोटी खाती उघडली गेली आहेत. लखपती दीदी – 3 कोटी दीदी तयार झाल्या आहेत.महाराष्ट्रात 50 लाखांवर दीदी तयार होण्यास भर दिला आहे. बचत गटांची संख्या 90 लाख आहे यामध्ये दहा कोटी महीलांचा सहभाग आहे. तीन तलाक मुळे महिलांना सामाजिक संरक्षण मिळाले आहे. प्रस्तुतीच्या वेळी महिलांना रजा 12 आठवड्यावरून 26 आठवडे करण्यात आलेली आहे. सरकारी शाळांमध्ये 9.8 कोटी प्रसाधनगृह मुलींसाठी बांधण्यात आलेली आहे. माता मृत्युदर 167 होता तो 80 वर आलेला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले आहे. मूळ शिक्षण पद्धती जोपासत वैश्विक शिक्षणाकडे वाटचाल करत आहोत. 1.6 कोटी युवकांना PM कौशल्य विकास प्रशिक्षण दिले गेले आहे. 9 आयआयएम, 7 आयआयटी, 490 नवीन विद्यापीठांची स्थापना केली आहे. 3.45 कोटी युवकांची EPFO खाती उघडली आहेत. स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 17.6 लाख रोजगार निर्मिती झाली आहे. उत्पन्न कर सवलतीचा हक्क – 12.75 लाखपर्यंत उत्पन्न करमुक्त केले आहे. 297 सेवा UMANG ॲपवर उपलब्ध आहेत. रिअल इस्टेट प्रकल्पांसाठी 37000 कोटी फंड दिला आहे. UPI वापरात वाढ झाली आहे, मेट्रो सेवा 5 शहरांवरून 23 वर पोहचली आहे. PM सूर्यघर योजना राबविण्यात येणार आहे.
आयुष्मान भारत योजनेत ९ कोटी लोकांना 1.3 लाख कोटींचा लाभ झाला आहे. जन औषधी केंद्र – 16000+ आहेत, लाभार्थी 6 कोटी+ आहेत. हेल्थ आयडी धारक 77 कोटी आहेत. एमबीबीएस जागांमध्ये 1.18 लाखांनी वाढ केली आहे, पीजी जागांमध्ये 74000 वाढ झाली आहे. ई-संजीवनीद्वारे 37 कोटी लोकांना आरोग्य सेवा दिली जात आहे.
ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन कावेरी, युक्रेनमधून 23000 भारतीयांची सुटका केली आहे. 5000 संरक्षण उपकरणे भारतातच बनवले जात आहेत. 24000 कोटींची संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप्समधून खरेदी केली जात आहे.7 ऑर्डनन्स फॅक्टरींपैकी 6 फायदेशीर ठरत आहेत. संरक्षण निर्यातीत 34% वाढ झाली आहे , एफडीआय 74% गुंतवणूक होत आहे.
चांद्रयान-3 मोहिमेद्वारे भारताची आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अव्वल उपस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मोदी सरकारचे हे अकरा वर्ष हे प्रत्येक भारतीयाच्या जीवनात बदल घडविणारी क्रांती आहे. 'राष्ट्र प्रथम' ही भावना ही मोदी सरकारच्या केंद्रस्थानी आहे.