Laluprasad Yadav on Son : लालूप्रसाद यादव यांनी स्वतःच्याच मुलाची केली हकालपट्टी ; सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा असलेले लालू प्रसाद यादव यांनी आपला मुलगा तेजा प्रताप यादव याला आपल्या पक्षातून काढुन टाकले आहे. याबाबत लालू प्रसाद यादव यांनी या बाबत 'एक्स' पोस्ट करत अधिकृत माहिती दिली आहे. खाजगी जीवनात नैतिक मूल्यांची जपणुक न केल्याने सामाजिक न्यायासाठीचा त्यांचा लढा कमकुवत होत आहे.
लालू प्रसाद यांचा मोठा मुलगा तेजप्रासाद याचे वर्तन , त्याचे व्यवहार त्याचे सामाजिक वर्तन हे सामाजिक जबाबदारी आणि कौटुंबिक संस्काराला धरून नाही त्यामुळे मी त्याला पक्षापासून आणि कुटुंबपासुन दुर करत आहे असे त्यांनी स्पष्ट केले. लालु प्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेजप्रासाद याला 6 वर्षासाठी पक्षातुन काढल्याचे सांगितले जात आहे.
तेजप्रासाद हे स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि सामाजिक आयुष्यातील निर्णय घेण्यास सक्षम असुन त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनी सुद्धा त्यांच्या बरोबर राहताना स्वतःच्या बुद्धीने योग्य ते निर्णय घ्यावेत असे ते या वेळी म्हणाले. त्याचप्रमाणे कुटुंबातील इतर आज्ञाधारी सदस्यांनी योग्य ती सामाजिक जबाबदारी चे आणि कुटुंबिक मूल्यांचे पालन केले आहे. असं ही ते यावेळी म्हणाले.
त्यांच्या या पोस्टच्या बाबतीत त्यांच्या लहान मुलगा तेजस्वी प्रसाद यांना विचारणा केली असता त्यालादेखील मोठया भावाचे वर्तन आवडलेले नाही. त्याच्या मते राजकीय जीवन आणि वैयक्तिक जीवन हे वेगळे ठेवले गेले पाहिजे. त्यांना ही त्यांच्या वडिलांची कारवाई ही माध्यमांमधुन कळली असे ते यावेळी म्हणाले. लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजा प्रताप यादव याने काही दिवसांपूर्वी आपल्या दुसऱ्या रिलेशनशिपबद्दल माध्यमांमध्ये पोस्ट टाकली होती. त्याच धर्तीवर आज त्यांच्या वडिलांनी हा निर्णय घेत तेजा प्रताप यादव यांना पक्षातून काढून टाकले.