Russia Plane Crash : रशियामध्ये विमानाचा मोठा अपघात ; मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता
रशियाच्या अमूर प्रदेशात अंगारा एअरलाइन्सचे विमान कोसळले आहे. त्यात 50 प्रवासी होते. रशियन सैन्याला अवशेष सापडले आहेत, त्यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. काही तासांपूर्वी हे विमान रडारवरून गायब झाले होते. विमान अपघातात सर्व 50 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.वृत्तसंस्था तासच्या वृत्तानुसार, N-24 कोडने चालवल्या जाणाऱ्या या विमानात 5 मुलांसह 43 प्रवासी होते. विमानात 6 क्रू मेंबर्स देखील उपस्थित होते.
इंटरफॅक्स न्यूजच्या वृत्तानुसार, विमान टिंडा विमानतळावर उतरणार होते, परंतु पहिल्या प्रयत्नात ते अयशस्वी झाले, त्यानंतर पायलटने पुन्हा ते उतरवण्याचा प्रयत्न केला, परंतु विमान १५ किमी अंतरावर कोसळले. विमानाचे अवशेष जंगलात सापडले आहेत.दोन महिन्यांपूर्वीच अंगारा एअरलाइन्सच्या AN-24 विमानाला धावपट्टीवर आग लागली. विमान किरेन्स्कमध्ये उतरत असताना, त्याचे नाक तुटले, ज्यामुळे विमानाला आग लागली. तथापि, त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातग्रस्त AN-24 चे अवशेष अर्धा किलोमीटरपर्यंत विखुरलेले आहेत. अपघातस्थळी उतरणे अशक्य आहे. दोरीच्या मदतीने बचाव पथके तेथे उतरवण्याची योजना आखत आहेत.२४ जुलै रोजी सकाळी ७:३६ वाजता विमानाने खाबरोव्स्क येथून उड्डाण केले. अंगारा एअरलाइन्सचे हे विमान खाबरोव्स्क - ब्लागोवेश्चेन्स्क - टिंडा मार्गावर होते.