Russia Ukraine War : ट्रम्प आणि पुतिन यांची फोनवर चर्चा; रशिया-युक्रेन युद्ध थांबणार?
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध लवकरच थांबण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून हा संघर्ष सुरु असलेला पाहायला मिळत आहे. या युद्धाचे अनेक गंभीर परिणाम देखील पाहायला मिळत आहेत. रशिया-युक्रेन युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. हा संघर्ष तात्पुरता थांबण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे.
यातच आता रशिया-युक्रेन युद्ध लवकरच थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
या दोघांमध्ये युक्रेन-रशियातील युद्धविरामाबाबतीत चर्चा झाली असल्याची माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता त्यामुळे आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काय भूमिका घेणार? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागले आहे.