बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा दुसरा हल्ला, 90 पाकिस्तानी जवान ठार
पाकिस्तानात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानामध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने जाफरा एक्सप्रेस ताब्यात घेतली. या ट्रेनमधील प्रवशांना ओलिस ठेवले होते. तसेच काही जवानांची हत्यादेखील करण्यात आली होती. मात्र आता याप्रकरणी एक नवीन माहिती समोर येत आहे. रविवारी बलूचिस्तानमध्ये सैन्याच्या एका तुकडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये पाकिस्तान सैन्याचे 90 जवान ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानातील क्वेट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात सात सैनिक ठार झाले आहेत. रविवारी पाकिस्तानातील क्वेट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात सात सैनिक ठार झाले आणि 21 जण जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेच्या 24 तासांपूर्वी, प्रांतातील दुसऱ्या मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाज दरम्यान बॉम्बचा स्फोट झाला होता. मुफ्ती मुनीर शाकीर यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती आणि स्फोटात इतर तीन लोक जखमी झाले होते.