Boat Sink
देश-विदेश
Boat Sink : हिंदी महासागरात 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; 7 जणांचे मृत्यू, अनेक जण बेपत्ता
थायलंड आणि मलेशियाच्या सीमेजवळील घटना
थोडक्यात
300 जणांना घेऊन जाणारी बोट बुडाली
थायलंड आणि मलेशियाच्या सीमेजवळील घटना
7 जणांचे मृतदेह साडले,13 जणांना वाचवण्यात यश
(Boat Sink) हिंदी महासागरात 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. दक्षिण थायलंडच्या तरुताओ या बेटाजवळ ही बोट बुडाली आहे.
ही बोट म्यानमारच्या बुथीडाऊंग या शहरातून निघाली होती. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर 13 जणांना वाचविण्यात यश आले, तर 7 जणांचे मृतदेह सापडले.
बचावकार्य सुरूच असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मलेशियाजवळ पोहोचल्यानंतर स्थलांतरितांना 3 लहान बोटींमध्ये विभागण्यात येणार होते मात्र त्याच्याआधीच ही बोट बुडाली.
