White House Firing
White House Firing

White House Firing : व्हाइट हाऊसजवळ गोळीबार; गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू

अमेरिकेतील 'व्हाईट हाऊस' जवळ नॅशनल गार्ड्सवर गोळीबार झाल्याची घटना घडली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(White House Shooting) अमेरिकेतील 'व्हाईट हाऊस' जवळ नॅशनल गार्ड्सवर गोळीबार झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोन नॅशनल गार्ड्स गंभीर जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमधील ‘व्हाईट हाऊस’ जवळ तैनात असलेल्या नॅशनल गार्ड्सवर हा गोळीबार करण्यात आला.

या गोळीबारानंतर काही वेळातच एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेनंतर अमेरिकेत मोठी खळबळ उडाली असून या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'खूप मोठी किंमत मोजावी लागेल’, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी गंभीर इशारा दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता व्हाइट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारात गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गंभीर जखमी झालेल्या 20 वर्षीय सारा बेकस्ट्रॉम हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जून २०२३ मध्ये सारा बेकस्ट्रॉम मिलिटरी भरती झाली होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

Summery

  • व्हाईट हाऊस परिसरात नॅशनल गार्डवरील गोळीबार प्रकरण

  • नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू

  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शोक व्यक्त केला

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com