Sonia Gandhi : सोनिया गांधी अचानक रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यी आणि संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची तब्येत मंगळवारी सकाळी बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) नुसार, छातीशी संबंधित तक्रारींमुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.
सध्या डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले असून, चेस्ट स्पेशलिस्टच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. काँग्रेस पक्ष किंवा रुग्णालयाकडून अद्याप अधिकृत हेल्थ रुटिन जारी झालेले नाही.
दीर्घकाळापासून आरोग्य त्रास; प्रदूषणाचा फटका
सोनिया गांधी यांना ९ डिसेंबर २०२५ रोजी ७९ वर्षे पूर्ण झाली. दीर्घकाळापासून खोकल्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या सोनियाजींना दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे त्रास वाढला आहे. त्यामुळे त्या वेळोवेळी चेकअपसाठी रुग्णालयात येत असतात. मागील अनेक वर्षांपासून आरोग्याशी संबंधित विविध समस्या भेडाळत असल्याने त्यांची नियमित तपासणी सुरू आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पुढील माहिती मिळेल.
याआधीही अनेकदा दाखल
याआधी १५ जून २०२५ रोजी सोनिया गांधी यांना पोटदुखीच्या तक्रारींमुळे सर गंगाराम रुग्णालयाच्या सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी विभागात दाखल करण्यात आले होते. त्या तिथे तीन-चार दिवस राहिल्या. त्याच आधी ७ जून रोजी प्रियंका गांधी यांच्या सिमला येथील निवासस्थानी सुट्टी घालवत असताना अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर त्या दिल्लीला परतल्या आणि ९ जून रोजी सर गंगाराम रुग्णालयात मेडिकल चेकअप केला. सध्या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, त्यांच्या प्रकृतीबाबत लवकरच अधिकृत अपडेट येईल.
सोनिया गांधी यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल.
छातीशी संबंधित तक्रारींमुळे चेस्ट स्पेशलिस्ट मार्गदर्शनाखाली उपचार सुरू.
दीर्घकाळापासून आरोग्य समस्या; प्रदूषणामुळे त्रास वाढला.
मागील वर्षांमध्येही अनेकदा रुग्णालयात दाखल; अधिकृत अपडेट लवकर येईल.
