Student Visa : विद्यार्थ्यांनी व्हिसा नियमांचे पालन न केल्यास अमेरिकेत प्रवेश कठीण ; Trump सरकारचा इशारा
अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दरवर्षी नवीन आधुनिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी वेगवेगळ्या देशात जात असतात. आधुनिक शिक्षण पद्धती आणि उच्च शिक्षणाची गुणवत्ता यामुळे अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी आकर्षित होतात. अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परदेशात जाऊन अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, तंत्रज्ञान, कला आणि मानव्यशास्त्र यांसारख्या विविध क्षेत्रांतील नवीन अभ्यासक्रम शिकुन त्या त्या विषयात पारंगत होण्यासाठी परदेशात वास्तव्यास असतात आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना व्हिसा काढावा लागतो आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या देशात वास्तव्य करायचे असेल तर त्या देशाचे नागरिकत्व स्वीकारावे लागते. मात्र यासाठी काही अटी विद्यार्थ्यांना पूर्ण कराव्या लागतात. आणि जर का या अटींची पूर्तता झाली नाही तर मात्र तो देश विद्यार्थ्यांना सोडावा लागतो. कारण प्रत्येक देश्याच्या व्हिसा आणि नागरिकत्वाच्या काही अटी असतात त्यांची पूर्तता करणे अनिवार्य असते.
अशाच काही व्हीसा बाबतीतल्या अटी अमेरिकेने विद्यार्थ्यांना लागू केल्याचे पाहायला मिळत आहे. जर विद्यार्थ्यानी इन्स्टिटयूटला न कळवता त्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रम मधेच सोडला किव्हा एखाद्या लेक्चर ला बसले नाहीत किव्हा अभ्यासक्रम पूर्ण केला नाही तर तुमचा व्हिसा रद्द होणार असं आदेश अमेरिकन एम्बसी दिले आहेत. विद्यार्थ्यांचा चांगला दर्जा राखणे केवळ अभ्यासापर्यंत च मर्यादित नसुन अमेरिकेत शैक्षणिक आणि व्यावसायिक संधी मिळविण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
भारतीय अमेरिकन दूतावासाने अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा च्या बाबतीतले निर्णय कडक केल्याचे पाहायला मिळत आहे . २७ मे २०२५ रोजी X वरील एका पोस्टमध्ये, भारतीय अमेरिकन दूतावासाने व्हिसा नियमांचे पालन करण्याचेआदेश दिले असून विद्यार्थ्यांना आठवण करून दिली की असे न केल्यास व्हिसा रद्द होऊ शकतो आणि भविष्यात त्यांना अमेरिकन व्हिसा मिळणे कठीण होऊ शकते. परदेशातील इन्स्टिट्यूट अचानकपणे सोडणे .किव्हा किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटला न कळवता तुमचा कार्यक्रम सोडणे किंवा तुमचा अभ्यास मध्येच सोडणे आणि त्याबद्दल त्या संबंधित इन्स्टिट्यूटला माहिती न देणे हे आता परदेशातील शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना महागात पडू शकते.
भविष्यात यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअर वर ही ह्याचा परिणाम होऊ शकतो. हा आदेश F-1 व्हिसाच्या अंतर्गत देण्यात आला असुन ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर प्रोग्राम (SEVP)अंतर्गत पूर्ण अभ्यासक्रम आणि नियमित उपस्थिती राखणे आवश्यक आहे. त्यामुळे आता अमेरिकेत शिकण्यासाठी जाताना विद्यार्थ्यांना सर्व अटींची पूर्तता करणे अनिवार्य असणार आहे.