Sunita Williams : सुनीता विल्यम्स अंतराळातून परतणार, करावा लागणार शारीरिक समस्यांचा सामना
हाडे कमकुवत होऊ शकतात
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्स या अंतराळ्यातून पृथ्वीवर परतल्यावर त्यांची हाडे कमकुवत झाली असतील. कारण अंतराळात राहिल्यामुळे त्याच्या हाडांची घट झाली असणार आहे. दरमहा एक टक्का याप्रमाणे ९ महिन्याचे ९ टक्के अशी घट झालेली आहे. हाडे कमकुवत झाल्याने फ्रॅक्चर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकेन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर आंततराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरुन पृथ्वीवर परतणार आहेत. जून 2024 रोजी दोन्ही अंतराळवीर आठ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळ स्थानकावर गेले होते. पण तिथे गेल्यानंतर अंतराळवीरांच्या अंतराळ्यानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे दोन्ही अंतराळवीर ९ महिने अंतराळ्यात अडकून राहिले. आता त्याचा परतीचा मार्ग मोकळा झाला. ते लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. नव्या मिशनमध्ये 4 सदस्यांची टीम अंतराळात पोहचली आहे.
नासाच्या ॲन मॅक्क्लेन आणि निकोल आयर्स, 'JAXA' संस्थेचे अंतराळवीर ताकुया ओनिशी आणि रशियाची रॉसकॉसमॉस एजन्सीचे किरिल पेस्कोव्ह या चौघांचा समावेश आहे. हे सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची स्पेस स्टेशनमध्ये जागा घेतील. त्यानंतर स्पेसएक्स क्रु ड्रॅगन अंतराळातून दोन्ही अंतराळवीर 18 मार्चला पृथ्वीवर परतणार आहेत. फ्लोरिडा समुद्राच्या किनाऱ्यापासून अंतरावीरांच्या लॉंडिंगचे नियोजन आखले आहे. हे लॉंडिंग मंगळवार 19 मार्चला भारतीय वेळेनुसार पहाटे 3.27 वाजता होणार आहे. मिळलेल्या माहितीनुसार सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर दोघानांही त्यांच्या दीर्घ प्रवासानंतर अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे.
शारीरिक समस्या
अंतराळातून पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांना शारीरिक समस्यांना समोरे जावे लागू शकते. अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. अंतराळातून परतल्यावर दोन्ही अंतराळवीरांना चालण्यास अडचण येऊ शकते. त्यांचे पाय जणूकाही लहान मुलासारखे असणार आहेत. कारण अंतराळात राहिल्यामुळे त्यांच्या पायांची जाड त्वचा मऊ होते. लहान मुलांची त्वचा जशी संवेदनशील असते. त्याचप्रमाणे त्यांचे पाय मऊ असणार असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे.
हाडे कमकुवत होऊ शकतात.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्स या अंतराळ्यातून पृथ्वीवर परतल्यावर त्यांची हाडे कमकुवत झाली असतील. कारण अंतराळात राहिल्यामुळे त्याच्या हाडांची घट झाली असणार आहे. दरमहा एक टक्का याप्रमाणे ९ महिन्याचे ९ टक्के अशी घट झालेली आहे. हाडे कमकुवत झाल्याने फ्रॅक्चर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दृष्टीची समस्या
दोन्ही अंतराळवीरांना दृष्टीच्या समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. दोघांना 'स्पेसफ्लाइट असोसिएटेड न्युरो- ऑक्युलर सिंड्रोम SANS'नावाच्या आजारानी ग्रस्त होवू शकतील. यामागील नेमके कारण काय? तर अंतराळवीर ९ महिने अंतराळात राहिल्याने मेंदूतील द्रवपदार्थाचे प्रमाण वाढते. ज्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते. यामुळे मेंदूला सुज येण्याची शक्यता असते.
ह्रदयविकाराचा त्रास
सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात दीर्घकाळ काळ वास्तव केल्याने त्यांना ह्रदयाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यांच्या ह्रदयाचा आकार अंडाकृती होतो. अंतराळात राहिल्याने ह्रदयांच्या आकार पाण्याने भरलेल्या फुग्यासारखा होतो. यामुळे ह्रदयरोग होऊ शकतो. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या शेकडो चाचण्या
पृथ्वीवर आल्यावर दोन्ही अंतराळवीराच्या अनेक चाचण्या केल्या जातील. यामध्ये स्नायूंच्या शोषणाची चाचणी, हाडांची घनता कमी होणे, ह्रदयांच्या चाचण्या तसेच रक्तवाहिन्यांसंबधी चाचण्या होण्याची शक्यता आहे.