रतन टाटांच्या मृत्यूपत्रामध्ये 500 कोटी रुपयांची संपत्ती कोणाच्या नावावर? एका व्यक्तीच्या नावाची चर्चा, कोण आहे ती व्यक्ती?
काही महिन्यांपूर्वी देशातील सुप्रसिद्ध उद्योजक व टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन नवल टाटा यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला होता. रतन टाटा यांच्यानंतर टाटा उद्योग समूहाचा उत्तर अधिकारी कोण होणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. त्यानुसार रतन टाटांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी टाटा उद्योगाची ही जबाबदारी त्यांचे भाऊ नोएल टाटा यांची सांभाळली. मात्र आता रतन टाटा यांच्या मृत्यूला चार महिने पूर्ण झाल्यानंतर रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण देश हळहळला होता. त्यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली. अशातच आता त्यांच्या मृत्यूपत्राबाबत एक गोष्ट समोर आली आहे ज्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा यांच्या संपत्तीचा एक तृतीयांश भाग म्हणजे तब्बल 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीच्या नावावर करण्यात आली आहे. याबद्दल आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रासंदर्भात काही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा यांच्या मृत्युपत्रात मोहिनी मोहन दत्ता यांना 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिली गेली आहे. टाटा व दत्ता यांच्या नात्याबद्दल खूपच कमी लोकांना कल्पना आहे. मात्र दत्ता हे नेमके कोण आहेत? याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया.
कोण आहेत मोहिनी मोहन दत्ता?
मोहिनी दत्ता यांनी त्यांच्या करियरची सुरुवात ताज ग्रुपमधून केली. त्यानंतर त्यांनी स्टॅलियन ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली. 2013 साली ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या इकाई ताज सर्व्हिसेसमध्ये स्टॅनली ट्रॅव्हल एजन्सीचे विलिनीकरण करण्यात आहे. यामध्ये दत्ता यांची 80% भागीदारी होती तर 20% भागीदारी टाटा ग्रुपची होती. नंतर या कंपनीला टाटा कॅपिटल ग्रुपने खरेदी केले आणि थॉमस कुकला विकले. आता ही कंपनी TC ट्रॅव्हल सर्व्हिस म्हणून ओळखली जाते. दत्ता या कंपनीमध्ये डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत. मात्र 500 कोटी रुपयांच्या संपत्तीबद्दल दत्ता यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.