Tesla Cyber Truck exploded
Tesla Cyber Truck exploded

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर टेस्ला सायबर ट्रकचा स्फोट

अमेरिकेतील लास वेगासमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलच्या बाहेर टेस्ला सायबर ट्रकचा स्फोट झाला आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू, सात जखमी झाले आहेत.
Published by :
Published on

अमेरिकेमध्ये नवीन वर्षाची सुरुवातच काही अनपेक्षित घटनांनी घडली आहे. अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लास वेगास येथील हॉटेलच्या बाहेर बुधवारी सायबर ट्रकचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू, सात जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

महत्त्वाचं म्हणजे हा ट्रक अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या टेस्ला या कंपनीचा सायबर ट्रकचा स्फोट झाला आहे. फटाके वाहून नेत असताना टेस्ला सायबर ट्रकला आग लागली आणि त्याचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

स्फोट झालेल्या वाहनाच्या मागच्या बाजूला फायरवर्क मोर्टार आणि कॅम्प फ्युअल कॅनिस्टर भरल्याचे आढळून आले आहे. यानंतर दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचा कसून तपास केला जात आहे. यापूर्वी अमेरिकेच्या न्यू ऑर्लियन्समध्ये गर्दीत ट्रक घुसवल्याच्या घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून या प्रकरणाचा दहशतवादी हल्ला म्हणून तपास केला जात आहे. या घटनेच्या काही तासांतच सायबर ट्रकचा स्फोट झाला आहे.

या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा-

इलॉन मस्क यांनी एक्सवर याविषयी माहिती दिली आहे की, “भाड्याने घेतलेल्या सायबर ट्रकमध्ये झालेला स्फोट हा प्रचंड प्रमाणात फटाके किंवा बॉम्ब गाडीत ठेवल्यामुळे झाल्याची पुष्टी आम्ही केली आहे. स्फोटाचा आणि वाहनाचा कुठलाही संबंध नाही. स्फोटाच्या वेळी वाहनाची सर्व टेलीमेट्री सकारात्मक होती. टेस्लामधील वरिष्ठांची एक संपूर्ण टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. आम्ही असा प्रकार यापूर्वी कधीच पाहिला नाही”, अशी प्रतिक्रिया मस्क दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com