Rafale Jet : राफेल लढाऊ विमानाची बॉडी आता भारतातच बनणार ; द सॉल्ट आणि टाटा ग्रुप कंपनीमध्ये करार

राफेल विमानाच्या बॉडी निर्मितीत भारताचा सहभाग वाढणार
Published by :
Shamal Sawant

राफेल लढाऊ विमान बनवणारी कंपनी दसॉल्ट एव्हिएशनने भारतातील टाटा समूहासोबत एक मोठा करार केला आहे. दसॉल्ट एव्हिएशन आता टाटा समूहाच्या सहकार्याने भारतातच राफेल लढाऊ विमानाची बॉडी बनवणार आहे. यासाठी दसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा समूहाने एक करार केला आहे. राफेल लढाऊ विमानांचे भाग भारतात तयार करण्यासाठी डसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड यांनी 4 उत्पादन हस्तांतरण करारांवर स्वाक्षरी केली आहे.

या सुविधेमुळे भारताच्या एरोस्पेस पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक होईल. भारतात धोरणात्मक आणि लष्करी विमानांच्या निर्मितीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. जिथे राफेल लढाऊ विमानाचे महत्त्वाचे भाग तयार केले जातील. यामध्ये विमानाचा फ्यूजलेज, संपूर्ण मागील भाग, मध्यवर्ती फ्यूजलेज आणि पुढचा भाग समाविष्ट आहे. असे मानले जाते की राफेलचा पहिला फ्यूजलेज 2028 पर्यंत या उत्पादन संयंत्रातून असेंब्ली लाइनमधून बाहेर येईल. कारखाना पूर्णपणे तयार झाल्यावर, दरमहा येथे 2 फ्यूजलेज तयार केले जातील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com