India-Pakistan War : अखेर चीनचं सत्य पुन्हा उघड झालं! परराष्ट्र मंत्री वांग यी यांच 'ते' विधान समोर |china external affair ministry
सध्या भारत पाकिस्तान युद्ध सुरु असताना दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी आणि जगभरात शांतता टिकवून ठेवण्यासाठी इतर देश हे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कालच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केली होती. यामुळे दोन्ही देशातील युद्धाला पुर्णविराम लागल्याची माहिती ट्रम्प यांनी स्वत: दिली होती. यानंतर जम्मू-कश्मीरमधील श्रीनगरमध्ये पुन्हा ड्रोन दिल्याचे आणि ड्रोनच्या हल्ल्याचे आवाज ऐकू आले.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन पुन्हा एकदा पाकिस्तानच्या समर्थनार्थ बोलताना दिसला. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यादरम्याव चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले की, "चीन पाकिस्तानचे "सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य" राखण्यासाठी त्याच्यासोबत उभा राहील. पाकिस्तानचा सर्वकालीन धोरणात्मक सहकारी भागीदार आणि खंबीर मित्र म्हणून, पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे, प्रादेशिक अखंडतेचे आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी खंबीरपणे उभा राहील", असं म्हटलं आहे.
एवढचं नव्हे तर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली आहे. यावेळी चीनचे परराष्ट्र मंत्री अजित डोवाल यांच्यासोबत बोलताना म्हणाले की," सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशांत आणि एकमेकांशी जोडलेली आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही चीनचे शेजारी आहेत, त्याचसोबत ते एकमेकांचे ही शेजारी असल्यामुळे त्यांना दूर हलवता येत नाही".
यावर अजित डोवाल म्हणाले की,"युद्ध ही भारताची निवड नव्हती, दहशतवादी हल्ल्यात भारताचं गंभीर नुकसान झालं असून दहशतवादविरोधी कारवाई करणे भारताला आवश्यक आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवानांचे गंभीर नुकसान झाले आणि भारताने दहशतवादविरोधी कारवाई करणे आवश्यक आहे. भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीसाठी वचनबद्ध असतील आणि शक्य तितक्या लवकर प्रादेशिक शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतील."
पुन्हा वांग यी म्हणाले की, "चीन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाला निषेध करतो. युद्ध ही भारताची निवड नाही या तुमच्या विधानाचे चीन कौतुक करतो. भारत आणि पाकिस्तान शांत आणि संयमी राहतील, तर योग्यरित्या हाताळतील आणि परिस्थिती वाढू नये अशी प्रामाणिकपणे आशा करतो".