थोडक्यात
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नव्या कराराला मंजुरी
ओरेकल कंपनी क्लाऊड सेवा, सुरक्षा सांभाळणार
(America) अमेरिकेत टिकटॉक सुरूच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नव्या कराराला मंजुरी देण्यात आली असून 2020 पासून भारतात टिकटॉक बंद करण्यात आले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव भारतात हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अमेरिकेत टिकटॉक सुरूच राहणार अमेरिकेतही या अॅपवर बंदी येणार असल्याचे बोलले जात होते. यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून या नव्या कराराला मंजुरी देण्यात आली आहे आणि या करारानुसार टिकटॉकचे नियंत्रण हे अमेरिकन गुंतवणूकदारांकडे जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
या करारामध्ये सहा अमेरिकन सदस्य टिकटॉक यूएसच्या नवीन बोर्डवर असणार आहेत.यामध्ये ओरेकल कंपनी क्लाऊड सेवा व सुरक्षा सांभाळणार असल्याची माहिती मिळत आहे.