Bharat Bandh : आज भारत बंदची हाक; कोणत्या सेवांवर परिणाम होणार?
(Bharat Bandh ) आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. आज देशभरातील 25 कोटींहून अधिक कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत. हे कर्मचारी बँकिंग, विमा, महामार्ग बांधकाम आणि कोळसा खाणकाम यासह अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत.
सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि देशविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी 10 कामगार संघटना आणि त्यांच्या संलग्न युनिट्सनी हा संप पुकारला आहे. ज्यामुळे अनेक अत्यावश्यक सेवांवर परिणाम होऊ शकतो.
या संपामुळे सामान्य जनतेचे हाल होण्याची शक्यता आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार आघाडी या शेतकऱ्यांच्या संघटनांनीही या संपाला पाठिंबा दिला असल्याची माहिती मिळत आहे.
काय बंद राहणार ?
बँकिंग सेवा
विमा कंपन्यांचे काम
पोस्ट ऑफिस
कोळसा खाणींचे काम
राज्य वाहतूक सेवा (सरकारी बसेस)
महामार्ग आणि बांधकाम कार्य
सरकारी कारखाने आणि कंपन्यांचे उत्पादन.
काय सुरू राहणार ?
बहुतेक खाजगी क्षेत्रातील कंपन्या काम करतील
रुग्णालये, वैद्यकीय आपत्कालीन सेवा सामान्य राहण्याची अपेक्षा
खाजगी शाळा/महाविद्यालये आणि ऑनलाइन सेवा.