Donald Trump: डोनाल्ड ट्रम्पचा थेट निर्णय, भारतासाठी मोठा संकट निर्माण; अमेरिकेच्या नव्या धोरणामुळे वातावरण तापले
भारताच्या रशियाकडून तेल खरेदीवरून अमेरिकेने गेल्या ऑगस्ट महिन्यात ५० टक्के टॅरिफ लावला असून, या निर्णयाचा दोन्ही देशांना फटका बसत आहे. भारताची अमेरिकेत निर्यात कमी झाली आहे, तर अमेरिकेत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि महागाई वाढली आहे. या टॅरिफमुळे भारत-रशिया-चीन जवळीक वाढली असून, ट्रम्प प्रशासनासाठी ही डोकेदुखी ठरतेय. सातत्याने भारतावर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर भारतातील अमेरिकन दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना थेट धमकी देणारा संदेश सोशल मीडियावर जारी केला आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे, "तुम्ही अमेरिकेतील कायदे किंवा नियम मोडण्याचा प्रयत्न केला तर संकटात सापडाल. अटक झाल्यास व्हिसा रद्द होईल, तुम्हाला भारतात परत पाठवले जाईल आणि भविष्यात अमेरिकेचा व्हिसा मिळणार नाही. तुम्ही अयोग्य ठराल." या इशाऱ्याने अमेरिकेत शिकणाऱ्या लाखो भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
दूतावासाच्या या भूमिकेमुळे द्विपक्षीय संबंध आणखी ताणले गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची भारताबाबत वादग्रस्त वक्तव्ये सातत्याने येत असून, टॅरिफ आणि व्हिसा धोरणांमुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भारत सरकारकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही, पण हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरतेय.
