Donald Trump : "...तर मी टेरिफ कमी करेन" ट्रम्प यांची आणखी एका नवी धमकी

Donald Trump : "...तर मी टेरिफ कमी करेन" ट्रम्प यांची आणखी एका नवी धमकी

डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली आहे की ते आयात शुल्कात (tariffs) कपात तेव्हाच करतील जेव्हा इतर देश त्यांचे बाजार अमेरिकेसाठी खुले करतील.
Published by :
Team Lokshahi
Published on

डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली आहे की ते आयात शुल्कात (tariffs) कपात तेव्हाच करतील जेव्हा इतर देश त्यांचे बाजार अमेरिकेसाठी खुले करतील. त्यांनी सांगितले की, "1 ऑगस्टची डेडलाईन असून, त्यानंतर कोणतेही विस्तार दिले जाणार नाहीत. याचा अर्थ असा की, जर इतर देशांनी त्यांच्या देशात अमेरिकन वस्तू आणि सेवांच्या आयातीवरचे निर्बंध कमी केले नाहीत, तर त्यांना अधिक शुल्क भरावे लागेल".

"आयात शुल्क म्हणजे टेरिफ कमी करणे, किंवा 'बाजार खुला करणे', हे दोन्ही देशांमधील व्यापारावर परिणाम करणारे घटक आहेत. जेव्हा एखादा देश आपल्या बाजारातील आयात शुल्क कमी करतो, तेव्हा इतर देशांमधून वस्तू आणि सेवांची आयात करणे सोपे होते. यामुळे, त्या वस्तू आणि सेवांची किंमत कमी होऊ शकते आणि ग्राहकांना अधिक पर्याय मिळतात. अमेरिका आणि जपानमध्ये आतापर्यतची याबाबत मोठी ट्रेड डील झाली असून त्यामध्ये 550 अरब डॉलर इन्व्हेस्ट केल्याचे सांगण्यात आले आहे". त्यात ट्रम्प यांनी आनंदाने सांगितले कि जपान पहिल्यादांच आपल्यासाठी बाजार उघडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जपानबरोबर डील केल्यामुळे आपल्याला फायदाच होणार असल्याचे यावेळी डोनाल्ड ट्रम्पने स्पष्ट केले. त्यांच्यासारखे जर कोणता देश आपला बाजार खुले करण्यास तयार असेल तर मी त्यांचे टेरिफ कमी करेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी ट्रंप ने फिलीपीन्स आणि इंडोनेशिया यांच्यासोबत सामंजस्याचा करार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याउलट भारताबरोबरची परिस्थिती अजूनही स्पष्ट करण्यात आलेली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com