Pahalgam terror attack
Pahalgam terror attack

Pahalgam terror attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना अटक

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Pahalgam terror attack ) जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली.

याच पार्श्वभूमीवर आता जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली दोन काश्मिरी नागरिकांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

त्यांच्या चौकशीतून राष्ट्रीय तपास संस्थेला दहशतवादी हल्ला करणारे तीनही जण पाकिस्तानी होते अशी माहिती मिळाली असून एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी बटकोटे, पहलगाम येथे परवेझ अहमद जोथार आणि हिल पार्क, पहलगाम येथील बशीर अहमद जोथार याच्या घरी गेले होते आणि दहशतवाद्यांना त्याठिकाणी आश्रय आणि जेवण देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com