UPSC Result 2024 | UPSC चा निकाल जाहीर, पुण्याचा अर्चित डोंगरे महाराष्ट्रात पहिला
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये शक्ती दुबे हा देशात पहिला आला असून हर्षिता गोयल दुसरी आली आही. तसेच अर्चित डोंगरेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. अर्चित डोंगरे हा महाराष्ट्रातून पहिला आला आहे. त्यामुळे यावर्षीदेखील महाराष्ट्राने मान उंच केली आहे.
इतर उमेदवार :
यूपीएससी परीक्षा ही सप्टेंबर महिन्यात झाली होती. तसेच त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट जानेवारी महिन्यात झली होती. त्यातून आता 241 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. शक्ती दुबे याने पहिली रँक मिळवली आहे. यानंतर हर्शिता गोयलने दुसरी रँक तर अर्चितने तिसरी रँक मिळवली आहे. यानंतर शाह मार्गी चिराग याने चौथी रँक मिळवली आहे. आकाश गर्ग याने पाचवी रँक मिळवली आहे. कोमल पुनिया यांने सहावी रँक प्राप्त केली आहे. आयुषी बन्सलने सातवी रँक प्राप्त केली आहे. राज क्रिष्णा झा याने आठवी तर आदित्य विक्रम अग्रवाल याने नववी रँक प्राप्त केली आहे. मयंक त्रिपाठी हे यूपीएससी परीक्षेत देशातून दहावे आले आहेत.
ठाण्यातील कन्या सरस :
दरम्यान UPSC परीक्षेत पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा आला असून महाराष्ट्रात पहिला क्रमांक त्याने पटकावला आहे. ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने 99 वा क्रमांक पटकावला असून ठाण्याच्याच अंकिता पाटीलने 303 वा क्रमांक मिळवला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांना त्यांचा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येईल.