Elon Musk on Donald Trump: “…तर ट्रम्प निवडणूक हरले असते”, मस्क यांचं मोठं विधान“; वाद विकोपाला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांच्यात आता नवा वाद पाहायला मिळत आहे. सुरुवातीला एलोन मस्क हे देखील याच सरकारचा एक भाग होते मात्र काही अंतर्गत वादामुळे एलोन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनातुन आपला मार्ग वेगळा केला. आणि त्या नंतर डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क एकमेकांवर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क रिपब्लिकन कर विधेयकावरून आता समोरासमोर आले आहेत. त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याचे सध्या चित्र आहे . डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर विधेयकावर जेव्हा एलोन मस्क ने नाराजी व्यक्त केली त्या वेळेला ट्रम्प यांनी सुद्धा पलटवार केला. तेव्हा मस्क यांनी असे उत्तर दिले, की जर ते नसते तर डोनाल्ड ट्रम्प निवडणूक जिंकले नसते.
मस्क यांनी एक्स वर लिहिले, “माझ्याशिवाय ट्रम्प निवडणूक हरले असते, डेमोक्रॅट्सनी सभागृहावर नियंत्रण ठेवले असते आणि रिपब्लिकन सिनेटमध्ये ५१-४९ मतांनी विजयी झाले असते.” ही कृतघ्नता आहे. सरकारने इलेक्ट्रिक वाहने आणि सौरऊर्जेवरील अनुदान कमी केले, परंतु तेल आणि वायू कंपन्यांना दिली जाणारी मदत तशीच सोडली, जे खूप चुकीचे आहे. एलोन मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'कर आणि खर्च' विधेयकावर जोरदार टीका केली. मस्क म्हणाले की, या विधेयकामुळे सरकारची तूट वाढेल.ज्यांनी याला मतदान केले त्यांना लाज वाटली पाहिजे.
यापूर्वी मस्क यांनी ट्रम्प यांच्या बिग ब्युटीफुललाही विरोध केला होता. ते घृणास्पद म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मी एलोनवर खूप निराश आहे. मी एलोनला खूप मदत केली आहे. मस्क यांना कर आणि खर्चाच्या बिलाची पूर्ण माहिती होती,. त्यावेळी त्यांना त्यात काहीच अडचण नव्हती, पण अचानक त्यांना अडचण आली, जेव्हा त्यांना कळले की इलेक्ट्रिक वाहने (EV) खरेदी करण्याच्या आदेशात आपल्याला कपात करावी लागेल कारण त्याची किंमत अब्जावधी डॉलर्स आहे.. मी एलोन यांच्यावर खूप नाराज आहे. मस्कसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले- मला नेहमीच एलोन मस्क आवडायचे., पण आता मला माहित नाही की आमचे नाते तसेच राहील की नाही.