Donald Trump On Iran Attack : "हल्ले हिरोशिमा-नागासाकीसारखे होते पण...", इराणबद्दल ट्रम्प यांचा मोठा खुलासा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अनेकदा त्यांच्या खळबळजनक वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. इस्रायल-इराण युद्धाबद्दल त्यांनी अलिकडेच केलेले विधान खूपच धक्कादायक आहे. ट्रम्प यांनी इराणच्या अणुऊर्जा केंद्रावरील हल्ल्याची तुलना हिरोशिमा-नागासाकीशी केली आहे.
हेगमधील नाटो शिखर परिषदेनंतर माध्यमांशी बोलताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, मला हिरोशिमाचे उदाहरण द्यायचे नाही. पण इराणवरील आपले हल्ले हिरोशिमा-नागासाकीसारखे होते. या हल्ल्यानंतरच युद्ध संपले.ट्रम्प पुढे म्हणाले की आता युद्ध संपले आहे. दोन्ही देशांनीही याची घोषणा केली आहे. अशाप्रकारे, 12 दिवस चाललेले हे युद्ध संपले आहे. मला वाटत नाही की इराण आणि इस्रायल आता एकमेकांवर हल्ला करतील.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा प्रत्युत्तर
खरं तर, इस्रायल-इराण युद्धादरम्यान अमेरिकेने इराणच्या तीन अणुतळांवर नतान्झ, इस्फहान आणि फोर्डोवर हल्ला केला होता. ट्रम्प म्हणाले की, या हल्ल्यात इराणचे खूप नुकसान झाले. त्यांची अणुस्थळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. आमच्या हल्ल्यामुळे इराणचा अणुकार्यक्रम थांबला असा दावाही ट्रम्प यांनी केला. अमेरिकन हल्ल्यानंतर इराणनेही प्रत्युत्तर दिले.
मृतांचा आकडाही समोर
इराकमधील कतारमधील अमेरिकेच्या तळावर इराणने हल्ला केला. इराणने कतारवर किमान 10 क्षेपणास्त्रे डागली. याशिवाय इराकमध्येही अनेक अमेरिकन तळांवर हल्ला करण्यात आला. तथापि, ट्रम्प म्हणाले की या हल्ल्यात आमचे कोणतेही नुकसान झाले नाही. 12 दिवस चाललेल्या या युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले. इराणमध्ये सुमारे 800 लोक मृत्युमुखी पडले तर इस्रायलमध्ये 24 ते 30 लोक मृत्युमुखी पडले.