Donald Trump : इराण-इस्रायल संघर्ष वाढत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला दिला 'हा' इशारा
(Donald Trump ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता जगभरामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून बंदी घातली असून तेहरानच्या लोकांना लवकरात लवकर शहर सोडण्यास सांगितले आहे. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बाजारामध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे. याच कारणामुळे तेलाचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अल्बर्टा येथे आयोजित जी-7 शिखर संमेलनादरम्यान ट्रूथ सोशल मीडिया पोस्टद्वारे तेहरानच्या लोकांना हा इशाराच दिला आहे. "इराणने ती 'डील' साइन करायला हवी होती, जी मी त्यांना सांगितली होती. मी स्पष्टपणे सांगतो, इराणला अणुबॉम्ब मिळवू देणार नाही. मी वारंवार हेच म्हटले आहे. सर्वांनी त्वरित तेहरान खाली करावे."अशा आशयाची ही पोस्ट असून यामुळे इस्रायल आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.
भारतामध्ये तेल महाग होण्याची शक्यता
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे जगभरामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून या त्यांच्या वक्तव्यामुळे तेलाच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर तेल आयात करत असते. या तेलाच्या किमती जर वाढल्या तर त्यामुळे भारतामध्ये पेट्रोल डिझेलचे पण दर वाढू शकतात.