Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढल्या वर्षी भारतात येण्याची शक्यता
थोडक्यात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढल्या वर्षी भारतात येण्याची शक्यता
पुढील वर्षी क्वॉड देशांची शिखर परिषद भारतात आयोजित
या परिषदेसाठी अद्याप तारीख निश्चित झालेली नाही
(Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील वर्षी भारतभेट देणार असल्याचे संकेत दिले आहेत. ओव्हल ऑफिसमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान व्यक्ती आहेत आणि माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी मी भारतात यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. मी पुढील वर्षी भारतात येईन,” असे ट्रम्प यांनी सांगितले.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. पुढील वर्षी भारतात क्वॉड देशांची शिखर परिषद होणार आहे. या परिषदेत भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.
या परिषदेसाठी अद्याप तारीख निश्चित झालेली नाही, मात्र ट्रम्प यांची भेट या परिषदेशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भारताच्या ऊर्जा धोरणावर बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, भारताने रशियाकडून तेल खरेदीचे प्रमाण कमी केले आहे आणि हे जागतिक बाजारासाठी सकारात्मक पाऊल आहे.
