Texas Flood Update
Texas Flood Update

Texas Flood Update : अमेरिकेतील टेक्सासमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 78 जणांचा मृत्यू, 41 बेपत्ता

अमेरिकेतील टेक्सासमध्ये शुक्रवारी पहाटे अचानक आलेल्या महापुरामुळे प्रचंड हानी झाली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Texas Flood Update) अमेरिकेतील टेक्सासमध्ये शुक्रवारी पहाटे अचानक आलेल्या महापुरामुळे प्रचंड हानी झाली आहे. आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे, तर 41 नागरिक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेत केर काउंटीतील ग्वाडालूप नदीच्या काठावर वसलेल्या 'कॅम्प मिस्टिक' या ख्रिश्चन मुलींच्या समर कॅम्पला मोठा फटका बसला आहे. सध्या पूर ओसरत असला तरी चिखल, ढिगारे, आणि विषारी सापांमुळे मदतकार्यात अडथळा येतो आहे.

काही मृतदेह कॅम्पपासून आठ मैलांपर्यंतच्या परिसरात सापडले आहेत. परिसरातील अनेक घरे, रस्ते, झाडं, विद्युत वाहिन्या यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या आपत्तीवर दु:ख व्यक्त करत केर काउंटीला ‘डिझास्टर क्षेत्र’ घोषित केलं असून, फेडरल आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा (FEMA) सक्रिय करण्यात आली आहे. स्थानिक रहिवासी, स्वयंसेवी संस्था, आणि अन्य नागरिक अन्न, कपडे, निवारा देत मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण अमेरिका आणि जगभरातून सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com