Uttar Pradesh Crime : माता न तू वैरिणी! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या चिमुकल्यांना आईनेच संपवलं
देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता दिल्लीमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 5 वर्षांचा अरहान आणि अवघ्या एका वर्षांची इनाया या दोन चिमुकल्यांनाच संपवले. त्यामुळे या प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पण महिलेने असे का केले ? याबद्दल आता सविस्तरपणे जाणून घेऊया.
उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमधील तालाब अली गावात राहणाऱ्या वसिम आणि त्याची पत्नी मुस्कान त्यांच्या दोन मुलांसह राहत होते. नेहमी हसतं खेळतं हसणारं घर उदासीनतेच्या छायेत दिसून आलं. नेहमी बागडणारी, खेळणारी मुलं ही निपचित बेडवर पडली होती. कारण त्या मुलांमध्ये जीव नव्हता. त्यांच्या बाजूला आई रडत होती. सकाळी नाश्ता करुन झोपलेली मुलं उठलीच नाहीत असं आई म्हणाली. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली. मात्र तपासणी करताना मुलांचे मृतदेह पोस्टमॉर्टमला घेऊन जाण्यासाठी आई मागेपुढे करु लागली. आईच्या या वागण्याचा पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी मुलांच्या मृत्यूचा तपास सुरू केला.
मुलांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आईला ताब्यात घेतले. त्यावेळी मुस्कान म्हणाली की, "सकाळी माझ्या मुलांनी चहा बिस्किट खाल्ल आणि झोपी गेले. नंतर त्यांना मी उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलं उठली नाहीत. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक वाढला. मुलांच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. त्यामुळे पोलिसांनी खाकीचा धाक दाखवला. त्यावेळी मुस्कानने सत्य सांगण्यास सुरुवात केली.
मुस्कान दिलेल्या माहितीनंतर पोलीस हैराण झाले. दोन चिमूकल्यांचा जीव आईनेच घेतल्याचे समोर आले. मुस्कानचे तिच्या आत्याच्या मुलासोबत म्हणजे जुनैदसोबत अफेअर सुरू होते. काही वर्षांपूर्वीच मुस्कानचे वसीमचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुलंदेखील होते. वसीम वेल्डिंगचे काम करत होता, त्यामुळे कामासाठी त्याला बऱ्याचदा बाहेर जायला लागायचे. जवळपास 3 वर्षाआधी मुस्कान आणि जुनैद पुन्हा एकदा एकमेकांच्या संपर्कात आले. या दोघांमध्ये जवळीक वाढली. मुस्कानची मुलं जुनैदला नको हवी होती. त्यामुळे मुस्कानने मुलांचाच काटा काढण्याचा निर्णय घेतला.
19 जूनला वसीम कामानिमित्त बाहेर गेला तेव्हा तिने रसगुल्लामध्ये मुलांना विष घालून खायला दिले. त्यानंतर या दोन्ही निष्पाप मुलांचा जीव गेला. सध्या पोलिसांनी मुस्कानला ताब्यात घेतले असून तिचा प्रियकर जुनैद हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.