UZ Chess Cup Masters 2025 : प्रज्ञानंद ठरला भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू

UZ Chess Cup Masters 2025 : प्रज्ञानंद ठरला भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू

उजचेस कपमधील विजयानंतर प्रज्ञानंदचा जागतिक चौथा क्रमांक, भारताची पताका उंचावली
Published by :
Team Lokshahi
Published on

बुद्धिबळ जगतात भारतासाठी ऐतिहासिक क्षण! 19 वर्षीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. उजचेस कप मास्टर्स 2025 स्पर्धेत शानदार कामगिरी करत त्याने विजेतेपद पटकावले आणि याच विजयानंतर तो लाईव्ह रेटिंगमध्ये भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू ठरला आहे.

प्रज्ञानंदची लाईव्ह रेटिंग आता 2778.3 इतकी झाली असून, त्याने थेट जगातील चौथे स्थान पटकावले आहे. यामुळे त्याने तीन स्थानांची झेप घेतली असून, ही रेटिंग आणि रँकिंग त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च आहे.

बालवयातच ग्रँडमास्टर किताब पटकावणारा प्रज्ञानंद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत सर्वोच्च शिखर गाठत आहे. उजचेस कपमधील या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतासह जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही चाहत्यांनी आणि दिग्गजांनी त्याला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

भारतीय बुद्धिबळ इतिहासात विश्‍वनाथन आनंदनंतर एवढ्या उच्च पातळीवर पोहोचणारा प्रज्ञानंद पहिलाच बुद्धिबळपटू ठरला आहे. त्याच्या या यशामुळे भारताची बुद्धिबळ क्षेत्रातील पताका आणखी उंचावली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com